Dr. Suman S. Koparde's personal blogs

Monday, March 06, 2006

माझा मुंबई अमेरिका विमानाचा प्रवास

मंगळवार-दिनांक १३डिसेंबर २००५ गेल्या महिनाभर अमेरिका दौऱ्यासाठी चाललेली धावपळ मुंबईच्या छत्रपती शिवाजी विमानतळावर येईपर्यंत चालूच होती। मी ४ महिन्यासाठी माझा मुलगा सुबोध( साफ़्टवेर इंजिनीअर, स्पाट्सिल्वेनिया शहर, वर्जीनिया राज्य) कडे निघाले होते। जेंव्हा मी बोर्डिंगसाठी आंत गेले तेंव्हा नाते वाईकांना विदाय देतांना माझें मन कावरे बावरे झाले। मीत्यांचेपासून दूरदूर जाणारहो या भावनेनें काहीशा नाराजीच्या भावनेनेंच मी त्यांचा निरोप घेतला। आंत गेल्या नंतर सेक्यूरिटी चेकसाठि २ तास लागलात। नंतर बोर्डिंग सुरु होतांच मी विमानांत रांगेमधून प्रवेश करून सीटवर येवून बसले। पहाटे २-४० ला विमानांने अंतराळांत झेप घेतली। त्यावेळी माझ्या पोटात कालवाकालव सुरु होऊन मला कसेसेच वाटू लागले। यासाठी की मी माझ्या मायभूमीला विदाय करत होते । मायदेशापासून दूरदूर निघाले होते। माझ्या नातेवाईकांचे, देश बांधवांचे सन्निध्य, तो स्नेह, ती रहाणी, तो आपलेपणा मला चार महिने फक्त आठवावाच लागणार होता। न कळत माझ्या डोळ्यांतून दोन अश्रु टिपकले।
विमान वर वर चढत होते। आपणहि त्याचे बरोबर फुलपाख़रां प्रमाणें वर वर जात असलेचा भास होत होता। मी ख़िडकींतून बाहेर डोकावले। असंख़्य तारे आकाशांत झगमगत असलेले दिसत होते। मला लहान मुला सारख़ मला आनंद व अचन्बा वाटत होता। सभोवार केबिनमध्ये प्रत्येकजण आपापल्या सीटवर बसलेले दिसत होते, एखाद्या ग्रहिणीने घातलेल्या रांगोळीच्या ठिपक्याप्रमाणे शिस्तीत! आमचे विमान लन्डनला निघाले होते। सकाळीं ६वाजता एअरहोस्टेसची प्रवाश्याना ब्रेकफास्त देण्याची धावपळ सुरु झाली। प्रत्येकाना त्यांच्या आवडीप्रमाणे ब्रेकफास्ट देतात। मुन्बई ते लंडन [हिथ्रो] हा १० तासॉचा प्रवास आहे। लंडनला हिथ्रोच्या टमिर्नल नं २वर बरोबर ७ वाजता आमचे विमान उतरले।
येथे भारतीय स्थानिक वेळेच्या ५तास मागे घड्याळातील कांटें फिरविले जातात। माझा पुढचा प्रवास याच टमिर्नलवरुन १० वाजता सुरु होणार होता। हा टमिर्नल[प्लटफ़ार्म] भारतातील प्लटफ़ार्मपेक्षा खुपच वेगळा आहे। दोन्ही बाजुनी बंदिस्त असलेल्या भिंतीमधूनच वेगवेगळ्या विमानांसाठी २० गेटवेज [विमानकडे जाण्याचे प्रवेश्द्वारें ] होते। मध्ये असलेल्या मोकळ्या जागेवर हॉटेलस ,स्टेशनरी कपडे,घड्याळे,वगैरेंची दुकानेॅ दिव्यांच्या झगमगाटातून उठून दिसत होती। हा प्लटफ़ाॅर्म म्हणजे अमेरिकेंत असणारा एक माॅलच होता। एकवार मी टर्मिनलच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत फ़िरुन सर्व गेटस् चे निरिक्षण् करुन घेतले। नंतर एका बेंचवर बसून नाश्टा करुन तासभर विश्रांती व झोप घेतलीं।
नंतर ९ वाजता लंड्न-वाशिंगटन् डी सी (डलस विमानतळ) विमानाचें बोर्डिंग ९।३० ला सुरुं होत असल्याचें टीव्हीवर दाखविण्यातं आले [गेट न्ं१ वर]। मी त्यावेळी प्रवेश करुन विमानांत माझ्या सीटवर जाऊन बसले। आपल्याला ४ महिने अमेरिकेंत राहायला मिळणार ,तेथील प्रेक्षणीय स्थळें पहायला मिळणार ,तेथील लोकांची राहणी ,संस्कृती जवळून पहायला मिळणार असल्याचा आनंद मला वाटत होता। विमानांत माझ्या शेजारीच जेनिफ़र नावाची ५० वर्षे वयाची एक अमेरिकन स्त्री बसली होती। ती स्वभावानें बोलकी असल्यामुळें लगेच आमचा परिचय होऊन आमचे बोलणें सुरुं झालें । ती मुलीकडे वाशिंग्टनला जाणार होती। तिनें भारतांत बेंगलोरच्या रामकृष्ण मिशन मध्ये २-३ वर्ष इंग्रजि प्राध्यापिकेचे काम केले होते। तसेच भारतिय खाद्यपदार्थांची व शाकाहारी जेवणाविषयी ची आवड तिने बोलून दाखवली। थोडक्यांत तिलाहि भारत देश आवडतो वभारताविषयी आकर्षण असल्याचे तिनें बोलून दाखविलें। मग आमच्याकदे असलेल्या पदार्थांची देवाणघेवाण झाली। भारतिय अध्यात्मशास्त्रा बद्दलहि दिलचस्पि असल्याचेंं तिनें सांगितलें।
मध्येंच मी खिडकीतून बाहेर डोकावले। आमचे विमान अटलांटिक महासागरावरून जात होते । मलामात्र सर्वत्र पांधरे ढग, एखाद्या शुभ्र कापसाच्या गादीप्रमाणें अंथरल्या सारखें दिसत होतें व आकाशाला पांधरे शुभ्र छतच बांधले असल्याचा भास होत होता। आमचें विमान डग व आकाश यामधून चालले होते,महासागर अजिबात दिसतच नव्हता । एव्हांना आम्हांला विमानांत एअर होस्टेस कडु न ब्रेकफ़ास्त व लंच देण्यांत आले होते यावेळी केंव्हा दलस येते असे वाटत होते । माझे व जेनिफ़र चे बोलणे चालले आहे तोच टीक २।३० विमान डलसच्या विमानतळावर उतरले । मी जेनिफ़रचा निरोप घेतला व सिक्यु रिटी चेक अपला क्यु मध्ये उभे राहिले । ते संपताच बाहेर येऊन व्हर्लिंग प्लट् फार्म वरून दोन मोठ्या ब्यग्ज घेऊन मी ठीक ५वाजतां एक्सिट कडे घाईघाईने निघाले। बाहेर सुबोध-वाणी हातांत फुलांचा गुच्छ व फुगा घेऊन स्वागतासाठी येऊन थांबलेले होते। मला हायसे वाटून मी त्यांचेकडे भेठण्यास निघाले। नंतर गप्पागोष्ठी करत डलसवाशिंग्टन विमानतळा वरुन कारने आम्ही स्पाटसिल्विनिया ला घरी आलो।
असा झाला माझा भारत-अमेरिका प्रवास !

Thursday, March 02, 2006

Hello Everyone !

सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यंकरवावहै।
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विशावहैहि ॥
ॐ शान्ति शान्ति शान्तिः